• सानिया खेळणार पाकच्या कोर्टवर

    कराची.- लग्नापासून तब्बल 8 महिन्यांनंतर सासरी पाकिस्तानात आलेली स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पती शोएब मलिकसोबत चांगलीच रमली आहे. मागीलपाच दिवसापासून कराचीत असलेल्या सानियाने पूरग्रस्त भागाची देखील पाहणी केली. दरम्यान, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची देखील या दाम्पत्याने भेट घेतली आहे. 
    पूरग्रस्तांसाठीच्या आर्थिक मदतीची हमी देत सानियाने पाकिस्तानात टेनिस सामना खेळण्याची इच्छाही या वेळी व्यक्त केली. त्यामुळे तीन महिन्यापूर्वी आर्थिक मदतीसाठी नकार देणा-या सानियाच्या होकारामुळे पीटीएफचा राग पूर्णत: मावळल्याची चर्चा आहे. 
    पाकिस्तानात पहिल्यांदाच लग्नानंतर आलेल्या सानियाने कराचीसह आसपासच्या प्रमुख शहराचाही दौरा केला. मागच्या वर्षी आलेल्या महापुरामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाचेही चित्र तिने पाहिले आहे.
    त्यामुळे या पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी टेनिस मॅच खेळण्याचा शब्दही तिने या वेळी दिला. सानिया-शोएब या जोडीने झरदारींची भेट घेऊन पूरग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी मॅचच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच सानियाच्या मॅचचे पाकिस्तानात आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे
  • You might also like

    No comments:

    Post a Comment